दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया + जया बच्चन + अखिलेशची “रिझर्व्ह” टेबलावर दिसली घट्ट मैत्री!!
रमजानचा महिना चालू असताना दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया गांधी, जया बच्चन, अखिलेश यांची “रिझर्व्ह” टेबलवर दिसली घट्ट मैत्री!! इंडियन नॅशनल मुस्लिम लीगने आज राजधानी नवी दिल्ली इफ्तार पार्टी दिली. मुस्लिम लीगने मागितलेले पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर देखील त्या पक्षाचे भारतात अस्तित्व उरलेच. ते केरळमध्ये वाढत गेले. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर मुस्लिम लीगने इंडियन नॅशनल मुस्लिम लीग असे नवे नाव धारण केले. त्या पक्षाचे वर्षानुवर्षे केरळमधून खासदार आणि आमदार निवडून आले.