Ram Mandir Flag : राम मंदिरात मोदींच्या हस्ते ध्वजारोहणाने पाकिस्तानला झोंबली मिरची, म्हटले- हा मुस्लिम वारसा मिटवण्याचा प्रयत्न
पाकिस्तानने अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या ध्वजारोहणावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी दावा केला की, हे भारतात धार्मिक अल्पसंख्याकांवरील वाढत्या दबावाचा आणि मुस्लिम वारसा मिटवण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.