Yunus Government : बांगलादेशात कट्टरपंथीयांचा वरचष्मा, युनूस यांनी शाळांमध्ये संगीत शिक्षकांची भरती रद्द केली
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने देशातील सर्व प्राथमिक शाळांमधील संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती पूर्णपणे रद्द केली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कट्टरपंथी इस्लामिक संघटनांच्या विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आला. संगीत इस्लामच्या विरोधात आहे असा दावा करून हे कट्टरपंथी गेल्या अनेक महिन्यांपासून या शिक्षकांची भरती रद्द करण्याची मागणी करत आहेत.