Murshidabad violence : मुर्शिदाबाद हिंसाचारात 113 घरांचे सर्वाधिक नुकसान; TMC नगरसेवकांच्या नेतृत्वात हल्ला; हायकोर्टाची कठोर भूमिका
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एप्रिलमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने गंभीर खुलासे केले आहेत. त्यात म्हटले आहे की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या एका स्थानिक नेत्याची हिंसाचारात भूमिका होती. स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम यांनी हे हल्ले केले.