Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या कामांवरील आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवी
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.