Akkalkot Attack : अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया- माझ्या हत्येचाच कट होता, हल्ल्यामागे सरकारच जबाबदार
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.