BJP Shiv Sena Shinde : भाजपसह शिवसेनेचीही विजयाची घोडदौड; कल्याण-डोंबिवली महापालिकेत 9, तर राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे. भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.