Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !
Municipal Commissioner पुण्यात मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात झालेला वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे. बुधवारी आयुक्तांची बैठक चालू असताना शिंदे हे जबरदस्ती आत घुसले, आयुक्तांवर धावून आले, असा आरोप आयुक्तांनी केलाय. तर, तुमचं वर्तन गुंडाप्रमाणे आहे, असं आयुक्तांनी शिंदेंना सुनावलं असल्याचही बोललं जातंय. दुसरीकडे आयुक्त नवल किशोर राम हे शिंदेंना हिंदीत ‘तुम बाहर निकल जाओ’ असं म्हणाले. त्यामुळे या वादाला हिंदी मराठी वादाचीही किनार असल्याचं बोललं जातंय.