Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला अखेर अटक; मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या व्यवहाराप्रकरणी कारवाई
पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल किसनचंद तेजवानी हिला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असतानाच तिला बेड्या ठोकल्याने तपासाला वेग येणार आहे..