Anjali Damania, : पार्थ पवारांवर FIR झाला की अजित पवारांचा राजीनामा नक्की; अंजली दमानियांचा दावा; नाशिक तपोवन वृक्षतोडी प्रकरणी महाजनांवर टीका
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे.