मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र, तर अन्य२८ महापालिकांमध्ये आघाडी करून निवडणूक लढवायला तयार असल्याची भूमिका आज काँग्रेसने मांडली. त्यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पासून काँग्रेसने फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात आजही कायम राहिले.