CM Fadnavis : धारावी कोणा खासगी व्यक्तीला दिली नाही, प्रत्येक धारावीकराला घर मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होत्या, मात्र आमच्या सरकारने प्रत्यक्ष कृती करून प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धारावीकरांना केवळ घरेच नाही, तर एक समृद्ध आर्थिक इकोसिस्टिमही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी येथे केले. यावेळी त्यांनी धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.