BMC Polls Seat : युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला; भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. मुंबईत भाजपने आपल्याकडे अधिक जागा घेतल्या आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे.