Jarange : जरांगे म्हणाले- ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू; 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन
मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही