Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला- युतीची चिंता करू नका, त्यांची गणितं आपल्याकडे, युतीत आत्मसन्मान महत्त्वाचा
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.