राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, 15 हजार 908 उमेदवार रिंगणात
राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (ता. 15) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत. तसेच पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.