• Download App
    Mumbai Politics | The Focus India

    Mumbai Politics

    BMC Polls Seat : युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला; भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा

    गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. मुंबईत भाजपने आपल्याकडे अधिक जागा घेतल्या आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे.

    Read more

    Prakash Mahajan : प्रकाश महाजन अखेर शिंदे गटात, एकनाथ शिंदेंनी स्वागत करत ठाकरे बंधूंच्या युतीवर साधला निशाणा

    मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.

    Read more

    Devendra Fadnavis : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू; ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.

    Read more

    Mumbai BMC Elections : द फोकस एक्सप्लेनर : मुंबईचा ‘किंग’ कोण? महायुतीचा विजयी धडाका विरुद्ध ठाकरेंची अस्तित्वाची लढाई! कुठे कुणाचे पारडे जड? वाचा सविस्तर

    मुंबई महानगरपालिका ही केवळ एक महापालिका नसून आशियातील सर्वात श्रीमंत सत्ताकेंद्र आहे. आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी ठरणार आहे. यावेळच्या रणधुमाळीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत:

    Read more

    Sanjay Raut : मुंबईत ‘मविआ’ची मोर्चेबांधणी; संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन; ठाकरे-राज युतीही अंतिम टप्प्यात

    मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Ashish Shelar :शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच; ठाकरे बंधूंच्या युतीवर आशिष शेलारांची टीका

    महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Read more