Mumbai Municipal : मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांसाठी भाजप-शिंदेसेना युती; 15 ते 20 जानेवारीदरम्यान निवडणुका शक्य
मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका भाजप-शिंदेसेना एकत्र लढणार आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्यात स्थानिक पातळीवर जागावाटपाचे सूत्र ठरवावे, असेही निश्चित झाले. दरम्यान, २९ मनपातील मतदारांची अंतिम यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे १५ ते २० जानेवारीदरम्यान निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.