Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला- परप्रांतीयांना मारणे हा मराठी माणसांचा विकास नाही; मुंबईत महायुतीचा विजय निश्चित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मागे उभा असल्याचे अधोरेखित होईल. विशेषतः भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, महायुतीच येथे राज्य करेल व मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या या विजयातून महाराष्ट्र कुणासोबत आहे हे ही स्पष्ट होईल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी परप्रांतीयाना मारहाण करणे म्हणजे मराठी माणसांचा विकास नसल्याचा टोलाही ठाकरे बंधूंना हाणला.