BJP’s Amit Satam : भाजपचा पलटवार- ठाकरेंचा महापौर झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल; 25 वर्षांत मुंबई पालिकेत 3 लाख कोटी लुटले
मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ यांसारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा १ लाख ७६ हजार कोटींच्या वर गेला नाही, मात्र ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे. तसेच महापौर ठाकरेंचा झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल, असा दावा अमित साटम यांनी केला.