Raj Thackeray : राज ठाकरेंचा भाजपला सवाल- सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही; पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही?
पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.