Ajit Pawar : मुंबई महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘स्वबळाचा’ नारा:37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीपासून फारकत घेत मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने आज 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या निवडणुकीची संपूर्ण धुरा नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, पक्षाने एकूण 100 जागा लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवारांना उद्यापासूनच अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.