Uddhav-Raj : ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे.