Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?
राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.