Mumbai Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलचा आणखी एक बळी! 25 फूट खोल गटारात पडून एकाचा मृत्यू; चार अधिकारी निलंबित
मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निष्काळजी कारभारामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालिका प्रशासनावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत असून, चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे.