Mumbai FDA : मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर FDA चा छापा; स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.