Eknath Shinde : मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले, भावनिकतेला नाकारले; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला, म्हणाले- महापौर महायुतीचाच होणार
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.