Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- विजयी मेळावा मराठीपुरताच होता, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.