Mumbai’s Deonar : मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई, आयकर विभागाकडून तपास सुरू
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाची भरारी पथके सध्या अत्यंत सतर्क आहेत. मुंबईसह विविध महानगरांमध्ये संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.