Mumbai BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; शिंदेंची मोठी घोषणा, वेतनवाढीसह ग्रॅच्युईटीचा मार्ग मोकळा
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू ठेवलेला संप अखेर मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आजपासून बेस्ट बससेवा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे.