Pune Bus Fire : पुण्यात मुंबई-बंगळुरू मार्गावर बसला भीषण आग; 30 वर प्रवासी बचावले; सर्व वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला
पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.