Mumbai airport : मुंबई विमानतळावर ८ कोटी रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटने मुंबई विमानतळावर बँकॉकहून अवैध वस्तूंची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून ८.१५५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत सुमारे ८.१५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.