Mumbai 2006 Blasts : 2006 मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींच्या सुटकेविरुद्ध सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; 24 जुलैला सुनावणी
२००६च्या मुंबईतील साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील केले होते.