MSME कंपन्यांसाठी सरकारने १०० कोटी रुपयांपर्यंतची नवीन कर्ज हमी योजना केली सुरू
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, सरकारने बुधवारी एमएसएमई क्षेत्रासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी एक नवीन क्रेडिट हमी योजना सुरू केली. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) सुरू करण्यात आलेल्या म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम (MCGY-MSME) चा उद्देश उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र उद्योगांना १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा प्रदान करणे आहे.