MP Nagesh Patil Ashtikar : उद्धव साहेबांवर नाराज नाही; सत्तेशिवाय कामे होत नाहीत, मतदारसंघाचा विकास आणि निधीसाठी शिंदेंसोबत जातोय- नागेश पाटील आष्टीकर
शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची टंचाई हेच असल्याचे स्पष्ट केले आहे.