MP Gogois : काँग्रेस खासदार गोगोईंच्या पत्नीचे पाकिस्तानशी असलेल्या संबंधांची SIT चौकशी करणार?
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर जोरदार टीका करताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, विरोधी पक्षनेत्याच्या ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्या पाकिस्तानी संबंधांची चौकशी करण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल आणि विशेष तपास पथक स्थापन केले जाईल.