MP Amritpal : पंजाबचे खासदार अमृतपाल यांच्या सदस्यत्वावर लवकरच निर्णय; संसदीय समितीने 54 दिवसांच्या रजेची शिफारस केली
संसदेच्या विशेष समितीने पंजाबमधील खदूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांना 54 दिवसांची अनुपस्थिती रजा मंजूर करण्याची शिफारस केली आहे. अमृतपाल सिंग एप्रिल २०२३ पासून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत. अटकेमुळे संसदेत अनुपस्थित राहण्याची परवानगी मागण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दोन विनंत्या सादर केल्या होत्या.