Motor Vehicle Bill 2026 : जुन्या गाड्या वापरणे आता महागणार; पर्यावरण कर दुप्पट; महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधिमंडळात आज ‘महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026’ एकमताने मंजूर केले असून, यामुळे राज्यातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विधेयकाची माहिती देताना स्पष्ट केले की, वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासोबतच पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.