Odisha : ओडिशाच्या ढेंकनाळमध्ये दगडी खाणीतील खडक कोसळला; 4 मजुरांचा मृत्यू, अनेक अजूनही अडकले
ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यात एका दगडाच्या खाणीत खडकाचा एक मोठा भाग कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली, जेव्हा गोपालपूर गावाजवळच्या खाणीत काही मजूर ड्रिलिंग आणि दगड काढण्याचे काम करत होते. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात 4 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काही अजूनही अडकले आहेत.