• Download App
    Moshi Garbage | The Focus India

    Moshi Garbage

    Moshi Garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटना; आतापर्यंत 7 मृतदेह आढळले, मृतांची संख्या 8 वर, एकाचा शोध अद्याप सुरू

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेत आज चौथ्या दिवशी शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.

    Read more

    Moshi Garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट: ९ जणांची सुखरूप सुटका; अजूनही ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

    पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत बचाव पथकांना मोठे यश मिळाले आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली कोसळलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती कायम असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.

    Read more