BJP Workers : मोदींचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून केला सत्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.