Rajnath Singh : राजनाथ सिंह म्हणाले- कोणत्याही हल्ल्याशिवाय पीओके परत मिळेल; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होऊ शकते
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले की, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) कोणत्याही लढाई किंवा हल्ल्याशिवाय आपोआप भारतात परत येईल. ते म्हणाले की, पीओकेचे लोक स्वतः स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि एक दिवस ते म्हणतील, “मीही भारत आहे.”