Morgan Stanley : भारतासाठी आनंदाची बातमी: जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवरही भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार, मॉर्गन स्टॅनलीचा विश्वास
जगभरातील अनेक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या छायेखाली असताना भारतासाठी मात्र दिलासादायक बातमी आली आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या जागतिक गुंतवणूक समितीने (Global Investment Committee – GIC) आपल्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहणार आहे. यामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.