money laundering case : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे दिल्ली, नोएडा आणि गोव्यात नऊ ठिकाणी छापे
अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लखनौ विभागीय कार्यालयाने रविवारी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत दिल्ली, नोएडा आणि गोवा येथील नऊ ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई मेसर्स भसीन इन्फोटेक अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या प्रमुख कर्मचाऱ्यांच्या आवारात करण्यात आली.