Mohan Bhagwat : स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात – मोहन भागवत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी आरएसएस मुख्यालयातील स्मृती भवनला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील त्यांच्यासोबत दिसले.