Iran Protests : इराण हिंसाचार- 538 जणांचा मृत्यू, 10 हजार जणांना अटक; इराणने अमेरिका आणि इस्रायलला दिली धमकी
इराणमध्ये १५ दिवस चाललेल्या हिंसक निदर्शनांमध्ये आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०,६०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एपी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये ४९० निदर्शक आणि ४८ सुरक्षा कर्मचारी आहेत. या निदर्शनांमध्ये, इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर त्यांनी हल्ला केला तर ते अमेरिकन सैन्य आणि इस्रायलला लक्ष्य करतील.