Mahesh Kothare : महेश कोठारे म्हणाले- मी मोदीभक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होईल; संजय राऊत म्हणाले – तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.