Raj Thackeray : राज ठाकरेंनी मांडली भूमिका- मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युती संदर्भात तसेच आगामी महापालिकेच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले आहे. तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.