Bombay High Court : बिनविरोध निवडीविरोधात मनसे-काँग्रेस हायकोर्टात; चौकशीची मागणी, आयोगाच्या तटस्थतेवर प्रश्नचिनह
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेसने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे या दोन्ही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.