Sanjay Gaikwad : कँटीन मारहाणप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; म्हणाले- कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, आय डोन्ट केअर
आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर आज अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. यामुळे त्यांच्या अडचणींत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. पण गायकवाड यांनी चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला त्याची परवा नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.